साहित्य :
- ४/५ ब्रेड स्लाईज
- ४/५ बटाटे
- ४/५ हिरवी मिरची
- ४/५ लसूण पाकळ्या
- १ चमचा जिरे
- १ चमचा शोप
- १ चमचा हळद
- १ चमचा तिखट
- १ मध्यम कांदा
- २ चमचे कोथिंबीर
- १ चमचा कॉर्न पावडर
- २ चमचे पुदिना
- १ चमचा कोथिंबीर
- १ चमचा कैरीचे तुकडे
- १ चमचा जिरे
- ३ चमचे दाण्याचा कुट
- चवीनुसार मीठ
- तेल
- प्रथम बटाटे उकडून घ्या. स्मॅॅश करा, एका पॅॅन मध्ये १ चमचा तेल घाला, त्यात मोहरी, जिरे, हिरवी मिरची, शोप घाला, कांदा घाला, तिखट घाला स्मॅॅश केलेला बटाटा घाला, छान मिक्स करा, लिंबाचा रस घाला , कोथिंबीर घाला अशा तऱ्हेने स्टफिंग तयार होईल.
- चटणी- हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, जीर, कैरीचे तुकडे, पुदिना, मीठ, साखर, सर्व साहित्य घालून बारीक वाटून घ्या.
- एका मोठया वाटीत पाणी घ्या व त्यात थोडं मीठ घाला, ब्रेड चे स्लाईजचे साईडच्या कडा काढून घ्या. २ सेकंद ब्रेड पाण्यात बुडवा आणि लगेच काढा. थोडं हाताने प्रेस करून पाणी काढून टाका.
- आता वरील भाजी तयार केलेली त्याचा रोल करा व ब्रेड च्या स्लाईज वर ठेवून दोन्ही बाजू दुमडून त्याला रोल तयार करा.
- ब्रेड क्रम्स वर घोळून गरम तेलात मध्यम आचेवर खरपूस तळून घ्या.
- सॉस किंवा कैरीच्या चटणी सोबत गरम गरम ब्रेड रोल खाऊ शकता.
- अशा प्रकारे कुरकुरीत ब्रेड रोल तयार होतील.
No comments:
Post a Comment