साहित्य :
- २ हिरवी मोठी वांगी
- २ कांदे
- १/४ वाटी दाणे
- २ टेबलस्पून धणे
- १ चमचा मोहरी
- १ टेबलस्पून लाल मिरची पावडर
- १ चमचा हळद
- १/२ चमचा हिंग
- १ चमचा मीठ
- १/२ टेबलस्पून गरम मसाला पावडर
- ६-७ टेबलस्पून तेल
- १० पाकळ्या लसूण
- ३ हिरव्या मिरच्या
- सर्वप्रथम वांग्यांना तेल लावून घ्यावे, आणि अंतर ठेवून वांग्याला सुरीने छोटे छोटे कट द्यावे. मग गॅॅसवर वांगी चांगली भाजून घ्यावी.
- वांगी चांगली भाजून झाल्यावर प्लेटमध्ये गार करायला ठेवावी. आता बाकीच्या साहित्याची तयारी करावी.
- वांगी थोडीशी गार झाल्यावर त्याचे भाजलेले वरचे कवर काढून टाकावे आणि वंग ठेचून घ्यावे किंवा हाताने बारीक करावे. त्याच बरोबर लसूण आणि हिरवी मिरची तेलावर थोडी परतून घ्यावी आणि मिक्सरमध्ये जाडसर ठेचा करावा.
- त्याच तेलावर दाणे परतवून घ्या.
- आता कढई मध्ये फोडणी द्यावी. हिंग मोहरी त्यानंतर कांदा घाला आणि थोडे परतून घ्या. आता धने आणि लसूण- हिरवी मिरचीचा ठेचा घालावा.
- हे सर्व चांगले परतून घ्यावे. आता तळलेले दाणे, हळद लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून चांगले १ मिनिट परतून घ्यावे.
- आता ठेचलेले वांगे घाला आणि चांगले २ मिनिटे परतून घ्या, चांगली वाफ येते.नंतर त्यावर कोथिंबीर घाला.
- अशा प्रकारे वांग्याचे भरीत तयार होईल.
No comments:
Post a Comment