Wednesday, April 26, 2023

चमचमीत रगडा पॅटिस


 

रगडा पॅटिस हे सर्वांनाच आवडणारे पदार्थ आहे. रगडा पॅॅॅॅटिस बनवायला सोपे आहे. हा चमचमीत पदर्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा आहे. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ. 

साहित्य :- 

  • २ वाटी - वाटाणे
  • १ टीस्पून - लाल मिरची पूड 
  • १ टीस्पून तेल 
  • १/४ टीस्पून मोहरी 
  •  १/४ टीस्पून जिरे 
  • १ टीस्पून आले लसूण पेस्ट 
  • १ चमचा गरम मसाला 
  • १ टीस्पून कोथिंबीर 
  • १ टोमॅॅॅटो बारीक चिरून 
  • २ मोठा चिरलेला कांदा 
  • १ टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची 
  • १/२ टीस्पून हळद 
  • चवीनुसार मीठ
     
पॅॅॅटिस बनवण्यासाठी साहित्य :- 

  • १/२ किलो उकडलेले बटाटे 
  • १ टीस्पून आलं लसूण पेस्ट 
  • १/२ टीस्पून धने पूड 
  • १/४ टीस्पून जिरे पूड 
  • १/४ टीस्पून हळद 
  • १/४ टीस्पून चाट मसाला 
  • चवीनुसार मीठ 
  • १/२ टीस्पून लाल तिखट 
  • १/२ टीस्पून गरम मसाला 
  • ३ चमचे कोथिंबीर 
  • १/२ वाटी ब्रेड क्रम्ब्स 
  • आवश्यकतेनुसार तेल 
कृती :- 

  • वाटाणे रात्री भिजत ठेवा.
  • सकाळी कुकरमध्ये शिजवून घ्या, त्यात मीठ, हळद, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि चार कप पाणी घालून कुकर तीन शिटी देवून बंद करा. आता मंद गॅसवर राहू द्या.
     
  • रगडा तयार करण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर कढई तापत ठेवा, त्यात २ चमचे तेल घाला. 
  • मोहरी, जिरे, आले लसूण पेस्ट, कांदा, टोमॅॅटो, लाल तिखट, हळद, गरम मसाला, घालून परतून घ्या. त्यात वाफवलेले वाटाणे घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजवून घ्या. 
  • पॅॅॅॅटिस बनविण्यासाठी बटाटे उकडून मॅश करुन घ्या, त्यात मीठ, हळद, धने पूड, जिरे पूड, चाट मसाला, गरम मसाला, हळद, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि ब्रेड क्रम्ब्स घालून मिसळून घ्या. 
  • आता हातावर बटाट्याची गोळी घेऊन पारी तयार करून पॅॅॅटिस बनवा आणि हे पॅॅॅटिस तेलात तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्या. सर्व पॅॅॅटिस तळून घ्या.
  • आता पॅॅॅॅटिस गरम करून त्यावर रगडा घाला आणि वरून चिंचेची आंबट गोड चटणी, हिरवी चटणी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक शेव घालून सर्व्ह करा. 

No comments:

Post a Comment