Wednesday, April 26, 2023

चमचमीत शेजवान नुडल्स


 

साहित्य :

  • साध्या नुडल्स 
  • कापलेला गाजर
  • एक शिमला मिरची 
  • कापलेला एक कांदा 
  • चिरलेला कोबी 
  • २ चमचे लसूण आणि लाल तिखट 
  • २ चमचे टोमॅॅटो सॉस 
  • शेजवान सॉस 
  • अर्धा चमचा काळी मिरी पावडर 
  • २ चमचे तेल 
  • चवीनुसार मीठ
     

कृती : 

  • सर्वात पहिले गॅॅसवर कढई ठेवा. त्यात तेल गरम करा. 
  • त्यामध्ये कांदा परतून घ्या.कांदा शिजत आल्यावर त्यात लसूण आणि लाल मिरची पेस्ट मिक्स करा आणि परतवून घ्या 
  • त्यामध्ये गाजर, कोबी, शिमला मिरची घालून थोडसं वाफवा आणि मग त्यात मीठ घालून वरून टोमॅॅटो सॉस, शेजवान सॉस, काळी मिरी पावडर घालून शिजवा. 
  • नुडल्स वेगळ्या पातेल्यात शिजवून घ्या 
  • भाज्या शिजत आल्यानंतर त्यात नुडल्स घालून मिक्स करा. नुडल्स खायला देताना त्यावरून  सॉस व्हिनेगर घालुन घ्या. 
  • अशा प्रकारे शेजवान नुडल्स तयार होतील.
 

No comments:

Post a Comment