साहित्य :
- १ पॅॅकेट सँँडविच ब्रेड
- २ उकडलेले बटाटे
- २ काकड्या
- २ कांदे
- २ टोमॅॅटो
- १०० ग्रॅॅम अमुल बटर
- १ बाउल कोथिंबीर
- १ चमचा आल्याचे तुकडे
- ३ हिरव्या मिरच्या
- १ चमचा जिरे
- १/२ मीठ चवीनुसार
- १/४ लिंबू
- ३ टेबलस्पून पाणी
- सर्वप्रथम चटणीची तयारी करावी. मिरची आणि आलं बारीक करून घ्यावे. त्यानंतर मिक्सर मध्ये कोथिंबीर, मिरची,आले, जिरेपूड, मीठ, आणि लिंबू पिळून बारीक चटणी करून घ्यावी.
- आता आपली चटणी तयार झाली. त्यानंतर काकडी टोमॅॅटो कांदा उकडलला बटाटा काढून ठेवावा. आता ब्रेडच्या स्लाईसला मस्का लावून घ्यावा. त्यानंतर चटणी लावून घ्यावी.
- आता काकडीचे बारीक बारीक तुकडे करून स्लाईस वर घालावे. त्यानंतर बटाट्याचे तुकडे. आता कांदा सपाट बारीक करून स्लाईस वर घालावा.
- त्यानंतर टोमॅॅटोचे पातळ स्लाईस करून त्यावर घालावे. आता दुसऱ्या ब्रेडच्या स्लाईसला चटणी लावावी आणि टोस्टर मध्ये घालून सँँडविच गॅॅसवर टोस्ट करून घ्यावा.
- अशा पप्रकारे आपला टोस्ट सँँडविच तयार होईल. सर्व्ह करताना त्यावर टोमॅॅटो सॉस लावावा.
No comments:
Post a Comment