चिकन हंडी
चिकन हंडी बनवण्याचे साहित्य :-
- १ किलो चिकन (मध्यम आकाराचे तुकडे करून)
- २ मोठे कांदे, लांब चिरून = २५० ग्रॅॅम्स
- २ मोठे टोमॅॅटो प्युरी = २५० ग्रॅॅम्स
- २०० ग्रॅॅम्स दही
- तेल
- मीठ
- ३ तमालपत्र
- ३ चमचे जिरे
- ४ हिरव्या वेलच्या
- १ चमचे काळी मिरी
- ३ मसाला वेलच्या
- अर्धा चमचा लवंग
- दीड इंच दालचिनीचा तुकडा
- १ चमचे काश्मिरी मिरची पूड
- अर्धा चमचा हळद
- १ लिंबाचा रस
- अर्धा चमचा कसूरी मेथी भाजून पावडर केलेली
- २ चमचे धणे पावडर
- २-३ चमचे आले लसणाची पेस्ट
- पाव कप कोथिंबीर.
चिकन हंडी बनवण्याची कृती :-
- स्वच्छ धुतलेल्या चिकनच्या तुकड्यांना १ चमचे मीठ, अर्धा चमचा हळद, लिंबाचा रस चोळून लावावा. चिकन असेच झाकून अर्धा तास मुरत ठेवावे.
- खडे गरम मसाले भाजून घेऊन. एका तव्यात तमालपत्र, दालचिनीचे तुकडे, काळी मिरी, मसाला वेलच्या, हिरव्या वेलच्या, जिरे आणि लवंग घालून मंद आचेवर सुगंध येईपर्यंत भाजून घ्यावेत. थंड झाल्यावर मिक्सरमधून फिरवून पावडर करून घ्यावी.
- चिकनच्या दुसऱ्या मॅॅरिनेशनसाठी चिकनवर ही गरम मसाला पावडर, लाल मिरची पूड, धणे पावडर आणि दही घालावे व नीट एकत्र करून घ्यावे. चिकन झाकून या मॅॅरिनेशनमध्ये १ तास फ्रीजमध्ये ठेवावे.
- १ तासानंतर चिकन बनवण्यास सुरुवात करावी. एका मातीच्या हंडीत ४-५ चमचे तेल गरम करून त्यात कांदा घालावा. हा कांदा चांगला परतून घ्यावा.
- कांदा खरपूस परतला की त्यात आले लसणाची पेस्ट घालावी. तिचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत परतून घ्यावी. थोडी कोथिंबीर घालावी आणि मॅॅरिनेटकेलेले चिकन घालून मोठ्या आचेवर परतून घ्यावे.
- ५ मिनिटे परतून घेतल्यानंतर त्यात टोमॅॅटो प्युरी घालावी. चवीपुरते मीठ घालून नीट एकत्र करून घ्यावे. झाकण घालून मंद आचेवर शिजू द्यावे.
- दहा मिनिटात एकदा चिकन वर खाली करून घ्यावे. आपण या रेसिपीत पाणी वरून घातले नाही आहे, चिकनच्या अगोदरच्या पाण्यातच परत झाकण घालून ते शिजू द्यावे.
- पूर्ण २५ मिनिटात चिकन शिजले आहे. जर रस्सा घट्ट हवा असेल तर झाकण काढून चिकन थोडा वेळ शिजवून जास्तीचे पाणी सुकू द्यावे. आता यात भाजलेली कसुरी मेथी पावडर घालून मिसळून घ्यावी. गॅॅस बंद करावा.
- एका बाजूला १ चमचे तेल गरम करून त्यात जिऱ्याची फोडणी करून घ्यावी. हे फोडणी चिकन रश्श्यात मिसळावी, वरून कोथिंबीर घालावी.
अशा प्रकारे आपली चिकन हंडी झाली तयार फुलके, पोळ्या, लच्छ पराठा किंवा वाफेवरच्या भातासोबत वाढावे.


No comments:
Post a Comment