साहित्य :- १) स्वच्छ केलेली कोणत्याही प्रकारातील कोळंबी, २) लाल तिखट, ३) हळद, ४) आलं-लसूण पेस्ट, ५) मीठ, ६) तांदळाचे पीठ, ७) तेल, ८) आमसुलाचा रस किंवा कोकम आगळ.
कृती :-
- एका भांड्यात कोळंबी घेऊन त्यामध्ये हळद, तिखट, मीठ, आलं-लसूण पेस्ट घालून एकत्र केला.
- त्यामध्ये कोकमचा आगल घाला. एक फ्राय पॅॅन घेऊन त्यामध्ये तेल घ्या. मॅॅरिनेट केलेली कोळंबी तांदळाच्या पिठात घोळवून ती थेट तव्यावर फ्राय करण्यासाठी ठेवा. एक बाजू चांगली शिजली की, मगच कोळंबी दुसऱ्या बाजूला परतून घ्या.
- कोळंबी छान कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घ्या. मस्त तिखट डाळ - भातासोबत ही कोळंबी छान लागते.

No comments:
Post a Comment