Tuesday, April 25, 2023

मऊ लुसलुशीत रवा केक


 

साहित्य : 

  • २ वाटी बारीक रवा 
  • १ वाटी ताजे दही 
  • १ वाटी पिठी साखर 
  • १ वाटी दूध 
  • १/४ वाटी तेल 
  • १ चमचा व्हॅॅनिला इसेन्स
  • थोडी टूटी फ्रुटी 
  • १ वाटी मीठ कुकरमध्ये तळाला घालण्यासाठी 
  • १ चमचा बेकिंग पावडर 
  • १ चमचा बेकिंग सोडा
     

कृती : 

  • प्रथम दही फेटून घ्यायचे, फेटलेल्या दह्यात तेल आणि पिठी साखर नीट मिक्स करून घ्यायचे. नंतर त्यात एक चमचा व्हॅॅनिला इसेन्स घालायचे. 
  • नंतर त्यात रवा नीट मिक्स करून १५-२० मिनिटे झाकून भिजण्यास ठेवावे. आता बेकिंगसाठी गॅॅसवर कुकर गरम करण्यास ठेवावे, कुकरच्या तळाला एक वाटी मीठ टाकून घावे.
  • रवा भिजल्यामुळे दही पूर्णपणे शोषून घेतो, आता ह्यात लागेल तसे दूध घालून केकचे बॅॅटर साॅॅफ्ट बनवून घेऊन यातच बेकिंग सोडा व बेकिंग पावडर छान मिक्स करून घेऊन तेल लावून ग्रीस केलेल्या केकच्या टीनमध्ये थोडी टूटी फ्रुटी घालून त्यावर हे बॅॅटर पसरवून घ्यावे. 
  • वरूनही थोडी टूटी फ्रुटी टाकून केकचा टीन गरम केलेल्या कुकरमध्ये स्टॅॅड ठेऊन त्यामध्ये बेक करण्यासाठी ठेवावे, कुकरची शिट्टी व रिंग काढून कुकरचे झाकण बंद करावे. साधारण ४० मिनिटे मेडिअम गॅॅस फ्लेमवर ठेवावे.
  • ४० मिनिटानंतर छान सॉफ्ट बेक झालेला रवा केक तयार होतो.गोल किंवा चौकोनी टीनमध्ये बेक केक करू शकता. 
  • अशा प्रकारे रव्याचा लुसलुशीत केक तयार होईल.
 

No comments:

Post a Comment