Tuesday, April 25, 2023

सकाळच्या नाश्त्यासाठी एक चविष्ट पदार्थ - तांदळाची उकड (झटपट व पौष्टिक)

             बऱ्याच जणांना हा प्रकार माहित नाही. पण हा आंबटतिखट प्रकार सकाळी खाल्ल्याने पोट व्यवस्थित भारलेल राहत आणि तुमच्या जिभेवर चांगली चवदेखील तरळत राहते. शिवाय हे पटकन तयार होत आणि हे करत असताना तुम्ही तुमची इतर कामही बाजूला करू शकता. 

* तांदळाची उकड बनवण्याचे साहित्य :- 

  • २ ग्लास ताक 
  • २ मोठे चमचे तांदूळ पीठ 
  • २ हिरव्या मिरच्या 
  • कोथिंबीर 
  • चवीनुसार मीठ 
  • २-३ लसूण पाकळ्या 
  • थोडसं किसलेलं आलं 
  • चिमुटभर साखर 
  • फोडणी 
  • तेल. 
* तांदळाची उकड बनवण्याची कृती :- 

  • आलं-लसूण पाकळ्या आणि मिरच्या एकत्र ठेचून घ्या. 
  • ताकामध्ये हे घाला. 
  • त्यामध्ये मीठ, साखर आणि तांदूळ पीठ घालून नीट मिक्स करून घ्या. 
  • हे मिश्रण जास्त घट्ट अथवा जास्त पातळ ठेवू नका. दुसऱ्या कढईत एक चमचा तेल घाला. 
  • त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, कडीपत्ता घालून फोडणी द्या. 
  • लगेच वरून हे तयार मिश्रण ओता आणि ढवळून झाकून ठेवा. 
  • एक कड काढून त्यात कोथिंबीर घाला. थोडं पातळ आणि घट्ट असं हे मिश्रण ठेवा. 
  • त्यानंतर शिजल्यावर काढून डिशमधून खायला घ्या. 
  • खाताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा याबरोबर वरून कच्च तेल घातल्यास, त्याची चव अधिक चांगली लागते.   
             अशा प्रकारे झटपट व पौष्टिक तांदळाची उकड तयार आहे. 

No comments:

Post a Comment