उपवासाला चालणारी रताळ्याची कचोरी. लहान मुलांसाठी तसेच उपवास असलेल्या मंडळींसाठी अस्सल महाराष्ट्रीय पदार्थ म्हणजे 'रताळ्याची कचोरी' घरी करून खाता येईल.
'रताळ्याची कचोरी करण्याचे सारणासाठीचे साहित्य :-
- १ मुठ चिरलेली कोथिंबीर
- १ वाटी खवलेले खोबरे
- ४-५ हिरव्या मिरच्या
- ५० ग्रॅॅम बेदाणे
- चवीनुसार मीठ
- साखर
- रताळी व बटाटे उकडून घ्यावेत व सोलून हाताने कुस्करून पुराणयंत्रातून काढून घ्यावेत. त्यात थोडे मीठ घालावे.
- १/२ चमचा तुपावर मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत. नंतर गॅॅसवरून खाली उतरवून त्यात खवलेले खोबरे, चिरलेली कोथिंबीर, बेदाणे, चवीनुसार मीठ व थोडीशी साखर घालून सारण करावे.
- रताळे व बटाटेची पारी करून त्यात थोडे सारण घालून कचोऱ्या करून ठेवाव्यात.
- नंतर आयत्या वेळी वरीच्या तांदळाच्या पिठात घोळवून तुपात / तेलात तळाव्यात.
No comments:
Post a Comment