या सँँडविचसाठी आपण बरेच पैसे मोजतो. पण हे बनवायला आतिशय सोप आहे आणि नाश्त्याला खाल्ल्यानंतर जास्त भूक लागत नाही.
साहित्य :-
१) ब्रेड
२) मेयो सॉस
३) कांदा, टोमॅॅटो, काकडी, गाजर
४) काळी मिरी पावडर
५) चवीनुसार मीठ
६) केचअप.
कृती :-
- एका बाऊलमध्ये मेयो सॉस काढून घ्या.
- त्यात कापलेला कांदा, टोमॅॅटो, काकडी, गाजर हे सगळ मिक्स करा.
- त्यात मीठ, काळी मिरी पावडर आणि हवा असल्यास चाट मसाला घाला.
- हे नीट मिक्स करून घ्या.
- आता ब्रेडचे काप घ्या. त्याच्या कडा काढून टाका.
- नंतर वरील मिश्रणात त्या स्लाईसवर नीट लावा. दुसरा ब्रेड त्यावर ठेवा.
- दोन्ही बाजूने ब्रेडला बटर लावा आणि मग मायक्रोवेव्हमध्ये ग्रील करा अथवा तव्यावर दोन्ही बाजूने नीट भाजून घ्या आणि केचअपबरोबर खायला घ्या.
No comments:
Post a Comment