साहित्य :-
- लादी पाव ६-८ (पावभाजीचे पाव)
- २ मध्यम उकडलेले बटाटे
- ३/४ कप डाळिंबाचे दाणे
- १० ते १२ द्राक्षं
- ३/४ कप बारीक चिरलेला कांदा
- १/२ कप रोस्टेड शेंगदाणे
- बारीक शेव (ऑप्शनल)
- १ चमचा पावभाजी मसाला
- १/२ चमचा चाट मसाला
- १२ चमचे तेल
- मीठ चवीनुसार
- बटर
- हिरवी चटणी आणि चिंचगूळाची चटणी.
- बारीक चिरलेल्या कांद्याला थोडा चाट मसाला लावून घ्यावा. प्रत्येक द्राक्षाचे दोन तुकडे करावे.
- उकडलेले बटाटे सोलून किसून घ्यावेत. कढईततेल गरम करून त्यात ४-५ चमचे चिंचगूळाचे पाणी घालावे. १ पावभाजी मसाला घालावा. किसलेले बटाटे घालावे. मीठ घालावे. मग एकजीव करून घ्यावे.
- एका मध्यम खोलगट ताटलीत तयार बटाट्याचे मिश्रण थापून घ्यावे. त्यावर कापलेली द्राक्षं, डाळींब आणि शेंगदाणे आवडीनुसार पसरवावे. थोडी शेव आणि कोथिंबीर घालून सजावट करावी.
- आपण वडापाव बनवताना पावाला तीन बाजूंनी चिर देतो तसे दाबेलीला लगतच्या दोन बाजूंना चिर द्यावा.
- त्यात चिंचगूळाची चटणी, हिरवी चटणी लावावी त्यात बटाट्याचे सारण घालावे. अजून हवे असल्यास थोडे डाळिंबाचे दाणे, रोस्टेड शेंगदाणे घालावेत आणि कांदा भरावा.
- तव्यावर १/२ चमचे बटर घालावे त्यावर दाबेली दोन्ही बाजूंनी शेकून घ्यावी.
- हवे असल्यास शेव लावावेत. .
No comments:
Post a Comment