शिळी पोळी खायला बऱ्याच जणांना आवडत नाही. पण बऱ्याचदा घरी शिळी पोळी उरल्यावर सकाळच्या नाश्त्याला चहा अथवा कॉफीबरोबर पोळी खावी लागते. मग नुसती पोळी खाण्यापेक्षा आपण मसाला पोळी करून खाऊ शकतो.
साहित्य :-
- शिळी पोळी
- कापलेला कांदा आणि टोमॅॅटो
- चिरलेला कोथिंबीर
- तिखट
- चाट मसाला
- चवीपुरते मीठ
- लिंबू
- बटर
मसाला पोळी बनवण्याची कृती :-
- चिरलेला कांदा, टोमॅॅटो, कोथिंबीर एकत्र करा.
- त्यावर चाट पावडर मीठ आणि तिखट करून नीट मिक्स करून एकत्र करून घ्या.
- शिळी पोळी तुम्ही तव्यावर बटर सोडून थोडी पापडाप्रमाणे कडक भाजून घ्या. जळू देऊ नका.
- ती खाली उतरल्यावर तयार केलेले मिश्रण त्यावर घाला आणि मस्तपैकी गरमागरम चहा अथवा कॉफीच्या सोबत तुम्ही मसाला पोळीची चव घ्या.
No comments:
Post a Comment