Saturday, April 15, 2023

साबुदाणा खिचडी

 

साहित्य :-

  • १५० ग्रॅम (अर्धी वाटी) साबुदाणा 
  • ८५ ग्रॅम ( १ मध्यम ) बटाटा १ सेमी छोटे तुकडे कापून 
  • ३५ ग्रॅॅम (पाव वाटी) शेंगदाण्याचे कुट 
  • १ मोठा चमचा तेल किंवा तूप 
  • २ हिरव्या मिरच्या चिरून 
  • १ छोटा चमचा जिरे 
  • अर्ध्या लिंबाचा रस 
  • १ छोटा चमचा साखर 
  • पाऊण चमचा मीठ 
 सजावटीसाठी :-

  • १ मोठा चमचा ओल्या खोबऱ्याचा कीस 
  • थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर  
कृती :-
  •  एका पातेल्यात साबुदाणे घेऊन त्यात साबुदाणे बुडेपर्यंत पाणी घालून ठेवावे.
  • २० ते २५ मिनिटानंतर सामौर्ण पाणी काढून, कमीतकमी ६ तासांसाठी ठेवावे. 
  • भिजलेल्या साबुदाण्यात दाण्याचे कुट, मीठ, साखर आणि लिंबू रस घालावा. 
  • हे सगळे मिश्रण चांगले एकत्र करून बाजूला ठेवावे. 
  • कढईत रेल किंवा तूप टाकून, ती मध्यम आचेवर गरम होण्यास ठेवावी. 
  • तेल गरम झाल्यावर त्यात जिरे टाकावे. 
  • जिरे तडतडल्यावर, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि बटाट्याची फोडी टाकाव्या. 
  • थोडेसे मीठ टाकून, व्यवस्थित ढवळून, २-३ मिनिटासाठी झाकण ठेवावे.
  • मंद आचेवर बटाटे शिजेपर्यंत झाकून शिजवावे.
  • आता साबुदाण्याचे मिश्रण घालून, हलक्या हातांनी परतून, खिचडी एकत्र करावी. 
  • परत २-३ मिनिटांसाठी झाकण ठेवून, मंद आचेवर खिचडी शिजू द्यावी. 
  • झाकण उघडून, परत थोडी ढवळून अजून २-३ मिनिटांसाठी झाकून ठेवावी. 
  • साबुदाणे फुलले आणि थोडे पारदर्शक झाले की खिचडी तयार झाली. 
  • गरम गरम साबुदाणा खिचडी खाताना वरून खोबरे, कोथिंबीर पेरून द्यावी.  

No comments:

Post a Comment