Saturday, April 15, 2023

बटाट्याची पातळ रस्सा भाजी...

 

साहित्य :-

  • २ कच्चे बटाटे 
  • २ कच्चे टॉमेटो
  • चिरलेला कांदा 
  • ४-५ पाकळ्या ठेवलेली लसूण
  • आल्याचे तुकडे 
  • तेल 
  • चवीनुसार मीठ 
  • गूळ 
  • हिंग 
  • गोडा मसाला 
  • कडिपत्ता 
  • हळद 
  • तिखट 
  • जिरे मोहरी 
कृती :-

  • बटाटे आणि टॉमेटोचे जरा मोठे तुकडे करून घ्यावेत आणि पाण्यात ठेवावे. 
  • लहान कुकरमध्ये तेल घ्यावे. तेल तापल्यावर त्यात जिरे, मोहरी, हिंग, कडिपत्त्याची तीन चार पाने घालून परतावे. वरून चिरलेला कांदा, बटाटे आणि टाॅॅमेटोचे तुकडे घालून मिक्स करावे. त्यानंतर त्यात हळद, तिखट, गूळ, गोडा मसाला, मीठ घालावे आणि मिक्स करून वरून तुमच्या अंदाजानुसार जाड रस्सा होईल इतके पाणी ओतावे. 
  • व्यवस्थित ढवळून घ्यावे, जेणेकरून मसाल्याच्या गुठळ्या राहणार नाहीत.
  • त्यानंतर कुकरचे झाकण लावा आणि साधारण तीन शिट्ट्या द्या. तुमची बटाट्याची पातळ रस्सा भाजी तयार आहे. 
  • गरमागरम भाजीवर तुम्हाला हवी असल्यास तिखट शेव घाला आणि पोळी अथवा पाव, ब्रेडसह खा. 

    

No comments:

Post a Comment