आज आपण बाजरी वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर मग बघूया साहित्य आणि कृती.
साहित्य :-
- ४ वाट्या बाजरीचे पीठ
- २ टीस्पून आलं, हिरवी मिरची, लसूण पेस्ट
- २ टीस्पून काश्मिरी लाल तिखट
- २ टीस्पून जिरे पूड
- २ टीस्पून धने पूड
- कोथिंबीर बारीक चिरलेली
- ३ टीस्पून दही
- १/२ टीस्पून तीळ
- हिंग, हळद, मीठ, साखर चवीनुसार
- २ टीस्पून तेल
- पाणी
- बाजरीच्या पिठात वरील सर्व जिन्नस एकत्र करून पीठ मळून घ्या.
- एकदम सैल वा एकदम घट्ट मळू नका.
- दह्याऐवजी (पाणी न घालता) पीठ ताटातच मळले तरी चालेल.
- पीठ मळून झाले की, तसेच अर्धा तास झाकून ठेवा.
- आता कढईत तेल गरम करा.
- मळलेल्या पीठाचे छोटे गोळे करून हातावरच वडे थापा आणि मंद आचेवर तळा.
- अशाप्रकारे तयार झाले बाजरीचे स्वादिष्ट वडे.
No comments:
Post a Comment