Thursday, April 27, 2023

आंब्याचा केक


 

साहित्य :- 

  • २ वाट्या रवा 
  • १ वाटी साखर 
  • पाऊण वाटी लोणी किंवा तूप 
  • १ वाटी दही 
  • १ वाटी दुध 
  • १ वाटी आंब्याचा पल्प ( फ्रेश किंवा कॅनमधला )
  • १ चमचा बेकिंग पावडर 
  • काजू, बदाम, बेदाणे हे सगळे ड्राय फ्रुट्स थोडे थोडे किंवा ऑप्शनल.
     
कृती :- 

  • एका भांड्यात रवा घ्या. त्यात दही, दुध, साखर, लोणी / तूप सगळे जिन्नस नीट कालवून ठेवा. 
  • हे मिश्रण ४/५ तास झाकून ठेवा. 
  • ४/५ तासांनी करायच्या वेळी त्यात बेकिंग पावडर व आंब्याचा रस मिक्स करा. 
  • ड्राय फ्रुट्स घालून चांगले मिक्स करा.
     
  • ओव्हनच्या भांड्याला तुपाचा हात लावून त्यात हे मिश्रण ओता. 
  • प्रीहीटेड ओव्हनमध्ये १५० ते १८० तापमानाला ४० ते ५० मिनिटे बेक करा. 
  • झाल्यावर सुरी किंवा विणकामाची सुई आत खुपसून पहा. 
  • जर स्वच्छ बाहेर आली तर समजा केक झाला.  
  

No comments:

Post a Comment