साहित्य :-
- १ कप बदाम
- १ कप साखर
- अर्धा कप दूध
- केशर
- चमचाभर तूप
- बाकी सजावटीसाठी, आवडीनुसार सुकामेवा/ केशरकाड्या इ.
- बदाम कोमट पाण्यात रातभर भिजत ठेवणे, गार हवेत खराब होत नाहीत.
- जर उष्ण हवामानात करत असाल तर अगदी कडकडीत पाण्यात तासभर भिजवून घ्या.
- दूध गरम करून त्यात केशर खलून घ्या.
- चांगले भिजले की बदाम काहीसे फुगून मऊ होतात आणि सालही सहज निघून येतात.
- मग सोललेले बदाम, साखर आणि दुध एकत्र करून ब्लेंडर मधून छान बारीक वाटून घ्या. वाटताना लागल्यास चमचा- दोन चमचे दूध आणखी घालू शकता.
- जाड बुडाच्या कढईत मंद ते मध्यम आचेवर अगदी चमचा- भरच तूप घालून त्यावर बदामाचं मिश्रण घाला.
- सतत ढवळत रहा.
- आपण दूध फार घातलेलंच नसल्यामुळे मिश्रण आळायला लगेच सुरुवात होते.
- मिश्रणाचा गोळा व्हायला लागला आणि कडा कोरड्या व्हायला लागल्या की विस्तवावरून उतरवा आणि हाताला झेपेल इतपत गार होऊ द्या.
- पेढ्यांंऐवजी वड्या/ कतली करायची असेल तर विस्तवावरून उतरवल्यावर तुपाचा हात लावलेल्या ताटली किवा ट्रेमध्ये थापा आणि थंड झाल्यावर वड्या पाडा.
- पेढ्यांसाठी थोडं गार झाली की मिश्रण चांगलंं घोटून घ्या. मग हाताला पुसट तूप लावून घेऊन पेढे वळा.
- पेढे वळताना वरून सुकामेवा / केशरकाड्या वैगेरे लावा.
No comments:
Post a Comment