Friday, April 21, 2023

लिंबाचे गोड लोणचे


साहित्य : 

  • ५ किलो लिंबू 
  • २०० ग्रॅॅम काळी मिरची 
  • १०० ग्रॅॅम मोठी वेलची 
  • ५० ग्रॅॅम जीरे
  • १० ग्रॅॅम दालचिनी 
  • तेजपान 
  • जावित्री 
  • ५० ग्रॅॅम लवंग 
  • ५ नाग जायफळ
  • १०० ग्रॅॅम सिरका 
  • ३ किलो साखर 
  • ५०० ग्रॅॅम आले
  • ४०० ग्रॅॅम सेंधा मीठ 
  • १०० ग्रॅॅम काळे मीठ
 
कृती : 

  • मोठया आकारात लिंबू घ्यावे. 
  • धुवून पुसून उन्हात सुकवावे नंतर चार चार खापा या प्रकारे कापाव्या की त्या एका बाजूने जोडलेल्या राहतील.
  • आल्यास सोलून बारीक करावे. सर्व मसाल्यांना अर्धवट कुटुन घ्यावे.
  • नंतर त्यात साखर व विनेगर मिसळून लिंबामध्ये भरून लिंबाना बरणीत ठेवावे व बरणीस चांगल्या तर्हेने बंद करून उन्हात ठेवावे.
  • १०-१५ दिवसात लोणचे तयार होऊन जाईल. 
अशा प्रकारे लिंबाचे गोड चवदार लोणचे तयार होईल. 

No comments:

Post a Comment