साहित्य :
एका वेळेस इतकी सगळी लिंबे हवीत असे नाही. रोजच्या वापरात लिंबाचा रस काढून झाला की सालीचे चार तुकडे जराशा मीठात घोळवावे व एका घट्ट झाकण्याच्या मोठ्या बाटलीत भरावे. साली साठत जातील तसा मीठात घोळवून बाटलीत भराव्या आवश्यक वाटल्यास थोडे जास्त मीठ घालावे.
- २०-२५ लिंबांच्या साली
- १ वाटी, पाव वाटी लाल तिखट
- २ वाट्या साखर
- ६ लिंबाचा रस व साली
कृती :
- सर्व जिन्नस एका भांड्यात एकत्र करून मिक्स करून घ्यावे.
- बाटलीतल्या सालीही त्यात मिसळाव्या. रुंद तोंडाच्या बरणीत हे मिश्रण भरावे.
- चौपदरी मलमली फडल्याचा दादरा बांधावा व बरणी ८-१० दिवस उन्हात ठेवावी.
- संध्याकाळी उचलून घरात ठेवताना बरणी हलवावी.दहा दिवसानंतर दादरा सोडून झाकण लावावे.
- झाकणावरून दुसरा दादरा बांधावा. लोणच्याचा रंग बदलला की ते तयार झाले असे समजावे.
- आवश्यक वाटल्यास मीठ व साखर थोडी जास्त घालावी.

No comments:
Post a Comment