Wednesday, April 19, 2023

उपवासाचे खमंग थालिपीठ भाजणी


             उपवासाच्या दिवशी नेहमीची मिश्र डाळीची भाजणी केलेले थालिपीठ खाता येत नाही. अशावेळी तुम्ही उपवास थालिपीठ भाजणी करू शकता. ही भाजणी करणे देखील फारच सोपे आहे.                                                           


साहित्य :-         

१) १ कप साबुदाणा 

२) १ कप राजगिरा 

३) १ १/२ कप वरई 

४) १ चमचा जिरे.







कृती
:- 

- एक जाड बुडाची कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये सगळ्यात आधी साबुदाणे भाजून घ्या. 

- साबुदाणा भाजायला घेतल्यानंतर तो छान फुलेस्तोवर भाजायचा असतो. साबुदाणा छान भाजला की, तो अधिक पांढरा शुभ्र आणि हलका दिसू लागतो. 

- साबुदाणा काढून घ्या आणि आता त्यामध्ये राजगिरा घालून तो छान परतून घ्या. वरईदेखील अशाच पद्धतीने छान भाजून घ्या. सगळ्यात शेवटी जिरे भाजा. 

- सगळे साहित्य एकत्र करून घ्या. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्या. रव्याच्या चाळणीतून चालून घ्या. 

- ही भाजणी तयार झाल्यानंतर त्यामध्ये मिरची, कोथिंबीर, मीठ आणि थोडीशी हळद घालून कणीक मळून थालिपीठ थापून छान खरपूस भाजा. 

- मस्त दह्यासोबत हे उपवासच थालिपीठ सर्व्ह करा.   


No comments:

Post a Comment