पनीरपासून बनणाऱ्या सर्व डिशीपैकी पालक पनीर ही सर्वात लोकप्रिय रेसिपी आहे. शिवाय ही खूप पौष्टिक सुद्धा आहे. तुम्ही ही डिश पराठा आणि जिरा राईससोबत सर्व्ह करू शकतात. बघूया टेस्टी व पौष्टिक पालक पनीरची रेसिपी !
कृती :-
पालक पनीर बनवण्याची पहिली पद्धत - पालकाची जुडी स्वच्छ निवडून धुवून घ्या आणि ५ ते ६ मिनिट उकळत्या पाण्यात शिजवून घ्या, आणि थंड व्हायला ठेवून द्या. उकळलेले पाणी फेकून देऊ नका. यात खूप पौष्टिक घटक असतात, शिवाय ते तुम्ही भाजीच्या ग्रेव्हीत सुद्धा वापरू शकतात. आता त्यात २ हिरव्या मिरच्या घालून त्याची मिक्सरमध्ये पातळ पेस्ट करून घ्या.
दुसरी पद्धत - एका पॅॅनमध्ये साजूक तूप, अर्धा चमचा जिरे आणि बारीक चिरलेली लसूण घाला आणि लसूण जरा. लालसर होईपर्यंत परतून घ्या. आता त्यात कांद्याची पेस्ट घालून मिश्रण दोन मिनिटे चांगले परतून घ्या.
तिसरी पद्धत :- आता मिश्रणात टोमॅॅटोची पेस्ट घालून सर्व सामग्री मंद आचेवर ४ ते ५ मिनिट परतून घ्या. पुढे, त्यात मीठ, लाल तिखट आणि ३ ते ४ मिनिट शिजवून घ्या.
चौथी पद्धत - मिश्रणात पालकची पेस्ट घालून सगळ्या गोष्ठी व्यवस्थित मिक्स करून ३ ते ४ मिनिट शिजवा आणि त्यात थोडं पाणी देखील मिक्स करा.
पाचवी पद्धत - आता तयार झालेल्या पेस्टमध्ये ताज्या पनीरचे तुकडे घालून दोन मिनिटे शिजवून घ्या.
हॉटेल स्टाईल पनीरची भाजी तयार आहे. पालक पनीर सर्व्ह करण्याआधी त्यामध्ये फ्रेश क्रीम घाला. जीरा राईस किंवा चापातीसोबत तुम्ही सर्व्ह करू शकतात.

No comments:
Post a Comment