Wednesday, April 19, 2023

झटपट पद्धतीचा मिक्स व्हेज पराठा





मिक्स पराठा बनवण्याचे साहित्य :-  

  • उरलेली भाजी 
  • उरलेला भात 
  • उरलेली आमटी 
  • गव्हाचे पीठ 
  • तांदळाचे पीठ 
  • चवीपुरत मीठ 
  • जिर 
  • ओवा 
  • हळद 
  • तिखट 
  • बटर 

मिक्स पराठा बनवण्याची पद्धत :

  • वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्या. 
  • यामध्ये पाण्याची गरज भासत नाही कारण तुम्हाला त्यात आमटी आणि भातामुळे आधीच नरमपणा आलेला असतो. 
  • व्यवस्थित भिजवून घ्या आणि त्याला तेल लावून दोन मिनिट्स ठेवा. 
  • पोळीप्रमाणे लाटा. तव्यावर बटर सोडून त्यावर हा पराठा भाजा. 
         अशा प्रकारे आपला गरमागरम मिक्स पराठा खाण्यास तयार आहे , सॉस आणि चटणीसह खायला द्या. यासाठी केवळ १० मिनिट्स लागतात.  




 

No comments:

Post a Comment