आज आपण भेंडी मसाला याबद्दल साहित्य आणि कृती जाणून घेऊ.
साहित्य :-
- भेंडी चिरलेली - २५० ग्रॅम
- टोमॅॅटो - १ स्लाईसमध्ये चिरलेला
- कांदा - १ बारीक चिरलेला
- आलं लसूण पेस्ट - १ लहान चमचा
- जिरेपूड - १/२ लहान चमचा
- हळद - १/२ लहान चमचा
- लाल तिखट - १/४ लहान चमचा
- धणेपूड - १/२ लहान चमचा
- आमचूर पावडर - १/४ लहान चमचा
- चाट मसाला - १/४ लहान चमचा
- गरम मसाला - १/४ चमचा
- कसुरी मेथी - १/२ लहान चमचा
- तेल तळण्यासाठी
- मीठ चवीनुसार
- भेंडी मसाला तयार करण्यासाठी कढईत तेल गरम करा.
- आता तेलात भेंडी टाकून हलकी तळून घ्या.
- आता भेंडी तळून प्लेटमध्ये काढून घ्या.
- उरलेल्या तेलात जिरे, कांदा, आलं लसूण पेस्ट टाकून चालवून घ्या.
- आता कांदा शिजल्यावर टोमॅॅॅटो टाकून १ मिनिट चालवून घ्या.
- आता हळद, धणेपूड, तिखट आणि जिरेपूड टाकून दोन मिनिट शिजवून घ्या.
- आता गरम मसाला, चाट मसाला, आमचूर पावडर, कसुरी मेथी आणि मीठ टाकून शिजवून घ्या.
- कसुरी मेथी आणि मीठ टाकून शिजवून घ्या.
- मसाला शिजल्यावर भेंडी टाकून १० मिनिट शिजवा.
- गॅस बंद करा आणि त्यावर कोथिंबीर घालून पराठा किंवा पोळीसोबत सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment