तुम्ही घरी देखील तयार करु शकता अशी साधी सोपी रेसिपी चायनीज भेळ. चला तर मग जाणून घेऊया याचे साहित्य आणि कृती.
साहित्य :-
- अर्धी मिडीयम पत्ता गोभी
- १ लहान गाजर
- १ लहान सिमला मिरची
- १ हिरवा कांदा
- २ मोठे चमचे शेजवान सॉस
- १ मोठा चमचा चिली सॉस
- १ कप फ्रायड नुडल्स
- १/४ लहान चमचा व्हिनेगर
- सर्व प्रथम उकडलेले नुडल्स तेलात तळून बाजूला ठेवा.
- सर्व भाज्या लांबीच्या दिशेने बारीक चिरून घ्या आणि मिक्सिंग बाऊलमध्ये ठेवा.
- शेजवान सॉस, रेड चिली सॉस, व्हिनेगर टाकल्यावर तळलेले नुडल्स टाका.
- सर्वकाही व्यवस्थित मिसळा आणि कुटुंबासह चायनीज भेळचा आनंद घ्या.
No comments:
Post a Comment