साहित्य :
- अर्धा किलो कारली
- १ चमचा मीठ
- १ लिंबाचा रस
- १ चमचा लाल तिखट
- पाव चमचा हळद
- १ चमचा जिरे
- पाव वाटी रिफाईड ऑईल
कृती :
- अर्धा किलो कारल्याच्या पातळ पातळ चकत्या कराव्यात.
- या चकत्यांना मीठ, एक लिंबाचा रस चांगला चोळून घ्या आणि १ तास तसेच ठेवावे.
- एका तासानंतर त्या कारल्याच्या चकत्या पाण्यात तीन-चार वेळा चांगल्या धुवून घ्याव्यात.
- कढईत पाव वाटी तेल घ्यावे. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे टाकावे.
- त्यानंतर वरील कारल्याच्या चकत्या स्वच्छ धुवून व घट्ट परताव्या.
- त्यानंतर त्यात हळद, लाल तिखट घालून कारले कुरकुरीत होईपर्यंत परतावे.
- अशा प्रकारे कारल्याची कुरकुरीत काप तयार होतील.
No comments:
Post a Comment