Tuesday, April 25, 2023

व्हेज फ्रँकी


साहित्य : 
  • स्टफिंग :
  • २ उकडलेले बटाटे 
  • २ वाट्या कोबी, पातळ उभा चिरून 
  • १ वाटी गाजर, पातळ उभे कापून 
  • १ वाटी शिमला मिरची, पातळ उभे काप 
  • १ चमचा तेल 
  • १ चमचा आले पेस्ट 
  • १ चमचा लसूण पेस्ट 
  • २ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून 
  • टोमॅॅटो सॉस 
  • फ्रँकी रॅॅप्स :
  • ३/४ वाटी मैदा 
  • २ चमचे तेल 
  • १/२ चमचा मीठ
     

कृती : 
  • पॅॅनमध्ये १ चमचा तेल गरम करावे. त्यात आले-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून परतावे. 
  • आता शिमला मिरची, गाजर, कोबी घालून परतावे. बटाटे बारीक करून घालावेत. लगेच टोमॅॅटो सॉस आणि मीठ घालून मिक्स करावे. खूप जास्त वेळ परतू नये. नाहीतर भाज्या मऊ होतात. हे मिश्रण एका भांड्यात काढून ठेवावे. 
  • मैदा, २ चमचे तेल, मीठ आणि पाणी घालून एकदम मऊ मळून घ्यावे. 
  • मळलेल्या पीठाचे समान गोळे करून घ्यावेत.पातळसर पोळी लाटून घ्यावी.  थोडे तेल घालून नीट भाजून घ्यावी. तयार मिश्रण पोळीच्या मध्ये उभट पसरावे. 
  • नंतर खालची थोडी बाजू वर दुमडावी आणि राहिलेली डावी उजवी दोन्ही बाजू एकावर एक ठेवून फ्रँकी तयार करावी. थोडे प्रेस करून थोडे गरम होऊ द्यावे.
  • गरम फ्रँकी टोमॅॅटो केचपबरोबर सर्व्ह करावी. मैद्याऐवजी गव्हाची पोलीसुध्दा करू शकता. 
                     अशा प्रकारे चमचमीत व्हेज फ्रँकी तयार होईल.
 

No comments:

Post a Comment