Saturday, April 22, 2023

तिळाच्या वड्या


 

           आज आपण तिळाच्या वड्या कशा बनवायच्या त्याचे साहित्य आणि कृती जाणून घेऊ.

साहित्य :- 

  • अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट 
  • अर्धा कप किसून भाजलेले सुके खोबरे 
  • अर्धा कप तीळ 
  • पाऊण कप किसलेला गूळ 
  • अर्धा टीस्पून तूप 
  • अर्धा टीस्पून वेलची पूड 
  • सुकामेवा  
कृती :-
 

  • तीळ गुलाबी रंगाचे होईपर्यंत खमंग भाजून घ्या. त्यातले अर्धे तीळ मिक्सरमध्ये भरड वाटून घ्यावे. 
  • पोळपाटाला तूप लावून ग्रीस करून घ्यावे.
  • एका कढईत गूळ घालून बारीक गॅसवर विरघळून घ्यावे.
  • गुळात भाजून वाटलेले तीळ, भाजलेले तीळ दाण्याचे कुट, तूप, दही, दुध व वेलदोड्याची पूड घालावी.
  • सर्व मिसळून गोळा तयार करावा. तूप लावलेल्या पोळपाटावर वरील मिश्रणाचा गोळा ठेवून, तूप लावलेल्या लाटण्याने अंदाजे अर्धा से.मी. जाड लाटून घ्यावे. 
  • वरून खोबरे पसरा व परत एकदा लाटणे फिरवावं. आवडीच्या आकाराचे काप करून घ्यावे. 
           अशाप्रकारे तयार झाल्या आहेत तिळाच्या वड्या.  


No comments:

Post a Comment