साहित्य :
- बटाटे १ किलो
- साबुदाणा १/२ किलो
- लाल तिखट / किंवा हिरव्या मिरच्या.
- जीर
- मीठ
- तेल/ तूप
कृती :
- साबुदाणा मंद आचेवर थोडासा भाजून घ्यावा.
- गार झाल्यावर मिक्सरवर पीठ करून घ्यावं.(हा कुटाणा वाचवायचा असेल तर सरळ साबुदाणा पीठ विकत आणाव)
- बटाटे उकडून, सोलून घ्यावे.
- उकडलेले बटाटे किसणीने किसून घ्यावे.
- त्यात साबुदाणा पीठ, लाल तिखट, भरड वाटलेलं जीर, आणि चवीप्रमाणे मीठ घालुन व्यवस्थित मळून घ्यावं.
- झीपलॉकची पिशवी तीन बाजूंनी कापून त्यात एक लाटी घेऊन पापड लाटून घ्यावे. गरज वाटल्यास पिशवीला / लाटीला तेलाचा/ तुपाचा हात लावावा.
- नंतर कडकडीत उन्हात २ दिवस पापड वाळवावेत.
- व पॅॅक करून ठेवावेत आवश्यकता असेल तेव्हा तेलात तळून घ्यावे.

No comments:
Post a Comment