साहित्य :
- अर्धा किलो मूगाची डाळ
- अर्धी वाटी उडीद डाळ
- वाटीभर सोललेला लसूण
- पाव किलो हिरव्या मिरच्या वा एक वाटी तिखट
- एक छोटी जुडी कोथिंबीर
- मीठ
- हिंग जिरे
- मिरीदाणे, हळद
कृती :
- मूगाची डाळ कोरडीच भरड वाटून घ्यावी. त्याबरोबर जिरे आणि मिरीदाणे वाटावेत. (या सर्व मिश्रणाचे प्रमाण असे नाही भिजवलेले पीठ झणझणीत लागले पाहिजे)
- उडदाची डाळ रात्रभर भिजत घालून सकाळी वाटावी. वाटताना त्यात लसूण व मिरच्या घालाव्यात. कोथिंबीर मात्र बारीक चिरून घालावी, वाटू नये.
- त्यात बाकीचे जिन्नस व मूगडाळीचे मिश्रण घालावे. नीट मिसळून घ्यावे. अर्धा तास तसेच झाकून ठेवावे.
- परत मिश्रण नीट मिसळून घ्यावे. यावेळी ते हाताला कोरडे लागू नये, लागल्यास थोडा पाण्याचा हबका मारावा.
- मग प्लॅॅस्टिकच्या कागदावर वा ताटात, सांडगे घालावेत.हाताने घालण्यापेक्षा जर जाडसर प्लॅॅस्टिकच्या पिशवीला छोटेसे भोक पडून (जिलेबीसाठी करतो तसे ) घातले तर हात खरब होत नाहीत, व सुबक सांडगे घालता येतात.
- हे सांडगे दोन दिवस कडक उन्हात वाळवावेत.
- मग सोडवून उलटवून परत वाळवावेत. पूर्ण वाळल्याशिवाय डब्यात भरू नयेत

No comments:
Post a Comment