आजकाल लस्सीमध्ये निरनिराळे प्रकारे बाजारात मिळतात. अनायसे प्रत्येकाच्या घरी आंब्याची पेटी आलेलीच असते. त्यामुळे नेहमीच्या लस्सीला एक छान टविस्ट देत तुम्ही देखील घरी मँँगो केसर ट्राय करू शकता.
साहित्य :-
- एका आंब्याचा गर
- एक वाटी दही
- गरजेनुसार साखर
- वेलची पूड
- दुधात भिजवलेल केसर
- सर्वात आधी आंब्याचा गर काढून घ्या.
- ब्लेंडरमध्ये आंब्याचा गर आणि दही धुसळून एकजीव करा.
- त्यामध्ये साखर, वेलची पूड आणि केशर दुध टाका.
- पुन्हा एकदा सर्व साहित्य घुसळून घ्या.
- सर्व्ह करताना ग्लासात बर्फ टाकून त्यावर लस्सी टाका.
- मलई, केशर आणि आंब्याच्या फोडीने ग्लास सजवा.
No comments:
Post a Comment