Thursday, April 27, 2023

हिरव्या टोमॅॅटोची चटणी


 

साहित्य :- 

  • हिरवे टोमॅटो पाव किलो 
  • डाळवं दोन टीस्पून 
  • तीळ दोन टीस्पून 
  • जिरे एक टीस्पून 
  • हिरव्या मिरच्या 
  • मीठ
  • गूळ, कोथिंबीर
  • कडीपत्ता 
  • चवीनुसार फोडणीचे साहित्य.
     
कृती :- 

  • टोमॅॅॅटो धुवून फोडी करून घ्या. 
  • एका कढईत जिरे, तीळ, डाळवं भाजुन काढून घ्या. 
  • त्याच कढईत अर्धा चमचा तेल घालून हिरव्या मिरच्या, फोडी टाका.
     
  • झाकण ठेवून फोडी मऊ होईपर्यंत शिजवून घ्या, त्यात चिरून कोथिंबीर घाला. 
  • मिश्रण गार होऊ द्या. सगळे जिन्नस एकत्र करून चटणी वाटा. 
  • वरून खमंग हिंगाची फोडणी घाला. 
        अशाप्रकारे तयार झाली हिरव्या टोमॅॅटोची चटणी. 

 

No comments:

Post a Comment