साहित्य :-
- २-३ बटाटे
- तेल
- हिंग
- हळद
- तिखट
- जिरे
- मोहरी
- चवीपुरते मीठ
- बटाट्याच्या लहान चौकोनी काचऱ्या करून घ्या आणि पाण्यात ठेवा.
- एका पॅॅनमध्ये तेल घ्या. त्यात जिरे, मोहरी, हिंग तडतडल्यावर कापलेले बटाटे परतून घ्या. वरून हळद, तिखट आणि मीठ घाला.
- मंद आचेवर हे परतत राहा. या काचऱ्या कुरकुरीत होईपर्यंत वाफवा. गॅस अजिबात मोठा ठेवू नका अन्यथा बटाटा पटकन जळेल.
- या कुरकुरीत काचऱ्या नुसत्या खायला देखील अप्रतिम लागतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरून ओलंं खोबरंं आणि कोथिंबीरही यावर घालून खाऊ शकता.

No comments:
Post a Comment