Tuesday, April 18, 2023

पाव भाजी

 


पावभाजी हा पदार्थ आवडत नाही असा व्यक्ती शोधून पण सापडणार नाही. आयुष्यात प्रत्येकाने एकवेळ तरी पावभाजी नक्कीच खालेली असते आणि बहुतांश लोकांचा तर हा सर्वात आवडता मेनू देखील असतो. सकाळचा नाश्ता असो किंवा रात्रीचे जेवण पावभाजी ह मेनू सर्वात आवडता आहे. आपण आज घरच्या घरी पावभाजी कशी बनवायची ते जाणून घेऊया.    
साहित्य :-

  • कांदा -२ (बारीक चिरलेला)
  • आले-लसूण पेस्ट २ टीस्पून 
  • गाजर - १ कप (चिरलेला)
  • लाल तिखट - १ टीस्पून 
  • हळद पावडर - १ टीस्पून 
  • धने पावडर - १ टीस्पून 
  • गरम मसाला - १ टीस्पून 
  • चाट मसाला - १ टीस्पून 
  • पावभाजी मसाला - १ टीस्पून 
  • टोमॅटो प्युरी - १ टीस्पून 
  • हिरवी धने - १ कप 
  • लौकी - १ कप (चिरलेला)
  • सिमला मिरची - १ कप (चिरलेली) 
  • बटाटा - ५ (उकडलेले)
  • लोणी - २ टीस्पून 
  • चवीनुसार मीठ 
  • पनीर - १ कप   
   कृती :- 

  1. प्रथम एका पातेल्यात बटर घालून गरम करा. नंतर त्यात कांदा सोनेरी होईपर्यंत शिजवा. 
  2. कांदा सोनेरी झाल्यावर त्यात आले-लसूण पेस्ट घाला. 
  3. दोन्ही गोष्टींचे मिश्रण चांगले तळून घ्या आणि नंतर टोमॅटोची पेस्ट घाला. 
  4. आता त्यात हळद, लाल तिखट घाला. 
  5. नंतर लौकी, सिमला मिरची, गाजर, धने पूड घालून मिश्रणात मिसळा.
  6. उकडलेले बटाटे चांगले मॅश करा. नंतर मिश्रणात बटाटे, मीठ, पावभाजी मसाला आणि पाणी घाला.
  7. गाजर घालून मिश्रण शिजवा. त्यानंतर त्यात चाट मसाला घाला. 
  8. मिश्रण शिजल्यानंतर गॅस बंद करा.
  9. पाव तयार करण्यासाठी तव्यावर तूप घाला. पाव मधूनच कापून तव्यावर ठेवा. 
  10. पाव व्यवस्थित तपकिरी होऊ द्या. 
  11. पाव भाजीसोबत सर्व्ह करा. भाजीवर कांदा, टोमॅॅटो पनीर, हिरवी कोथिंबीर सजवून सर्व्ह करा. 
  अशाप्रकारे पावभाजी तुम्ही देखील घरी बनवू शकता.  


No comments:

Post a Comment