कोणत्याही उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवला जाणार पदार्थ म्हणजे शेंगदाण्याची आमटी. बनवायला खूपच सोप्पी आणि चवीला खूपच स्वादिष्ट लागणारा हा पदार्थ उपवासाच्या दिवशी नक्की बनवा. चला तर मग जाणून घेऊया या पदार्थासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य :-
- १ वाटी दाण्याचे कूट
- ३-४ हिरव्या मिरच्या
- २-३ आमसुले
- चवीनुसार मीठ
- साखर किंवा गूळ
- २ लवंग
- १ दालचिनीचा तुकडा
दाण्याचे कूट थोडे पाणी घालून मिरच्या,लवंग, दालचिनी यांच्यासोबत पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्या. नंतर त्यात आणखी पाणी घालून मिश्रण सारखे करा. मीठ, आमसुले व साखर घाला. नंतर आमटी उकळण्यास ठेवा. तुपात जिऱ्याची फोडणी करून आमटीत घाला.
टीप :- आपण आमसुले यायेवजी ताक किंवा दही देखील वापरू शकता.

No comments:
Post a Comment