आज आपण पाहणार आहोत कोबीच्या वड्याचे साहित्य आणि कृती.
साहित्य :-
- कोबी
- हिरवी मिरची / लाल तिखट
- मीठ
- जिरे
- हळद
- लसूण
- लिंबूरस
- आले
- बेसन पीठ.
- साधारण मध्यम आकाराच्या भरीव कोबी घ्यायचा.
- तो किसने शक्य नसेल तर मग बारीक चिरायचा.
- मग त्यात मिक्सरमध्ये वाटलेले वाटण (हिरवी मिरची, जिरे, लसूण, अद्रक, मीठ, हळद) घालायचे.
- थोडासा लिंबूरस घालायचा. त्यात मावेल तेवढे बेसन घालून पीठ भिजवायचे.
- ह्यात वरून पाणी घालायची गरज नसते. पण जर कोबी चिरून घेतला तर जरासे पाणी घालावे लागेल.
- मग ह्या पीठाचे कोथिंबीरीच्या वडीला करतो तसे मुटकुळे करून ते कुकरमध्ये उकडून घ्यायचे.
- उकडल्यानंतर त्याच्या वड्या कापून तव्यावर तेल घालून खरपूस परतायच्या.
No comments:
Post a Comment