साहित्य :
- ७० ग्रॅॅम बासमती तांदूळ
- १ लहान कांदा
- १+१/२ टेबलस्पून पत्ता कोबी
- १+१/२ टेबलस्पून गाजर
- १ टेबलस्पून सिमला मिरची
- १+१/२ टेबलस्पून कांदा पात
- ७-८ लसूण पाकळ्या
- १/२ इंच आलं
- १ चमचा शेजवान सॉस
- १ चमचा सोया सॉस
- १ चमचा टोमॅॅटो सॉस
- १/२ टीस्पून चिली सॉस
- १ टेबलस्पून तेल
- मीठ चवीनुसार
- प्रथम बासमती तांदूळ स्वच्छ धुऊन पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घेतला शिजवताना त्यात थोडे तूप घातले म्हणजे भात मोकळा होतो.
- कांदा, गाजर, सिमला मिरची, कांदा पात, कोबी, या भाज्या बारीक चिरून घेतल्या लसूण व आले दोन्ही बारीक चिरून घेतले. गॅॅसवर कढईमध्ये तेल गरम करून त्यात लसून आलं परतून घेतले.
- आता कांदा परतून मग त्यात गाजर, सिमला मिरची, पत्ताकोबी, हे परतले.
- मग त्यात भात मिक्स केला, त्यात शेजवान, टोमॅॅटो, सोय हे सर्व सॉस क्रमाने घालून घेतले. व मिरपूड व थोडे मीठ मोक्स करून परतले.
- आता सर्व मिक्स करून भात तयार झाल्यावर डिश मध्ये काढून त्यावर कांदा पात घालून सर्व्ह करावे.

No comments:
Post a Comment