Friday, April 21, 2023

हाॅॅटेलसारखा यम्मी आणि चटपटीत पास्ता


 


साहित्य : 

  • पास्ता 
  • पास्ता मसाला 
  • गाजर 
  • कोबी 
  • फरसबी 
  • मटार ,सिमला मिरची 
  • कांदा 
  • कोथिंबीर
  • पास्ता सॉस 
  • तेल आणि चवीपुरतंं मीठ
     
कृती : 

प्रथम पातेल्यात पाणी घेऊन ते उकळून घ्या. उकळलेल्या पाण्यात पास्ता घाला. थोडासा पास्ता चमच्यात घेऊन तो शिजला आहे की नाही ते पाहा. पास्ता शिजल्यावर त्यातील गरम पाणी काढण्यासाठी तो चाळणीत ओता. नंतर नळाच्या साध्या पाण्यानं धुऊन थंड करा. त्यानंतर पास्ताला अर्धा चमचा तेल लावून तो बाजूला ठेवा. आता सर्व भाज्या चिरून घ्या. नंतर पॅॅन गॅॅसवर ठेवून त्यात तेल घालून, गरम तेलात कांदा घालून तो सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्या. चिरलेल्या सर्व भाज्या टाकून ते मिश्रण परतवून घ्या. त्यात चवीपुरतंं मीठ घाला. मात्र भाज्या मऊ होणार नाहीत याची काळजी घ्या. आता या मिश्रणात पास्ता घाला. तसच त्यात पास्ता मसाला घालून हे मिश्रण शिजू द्या. हे मिश्रण शिजल्यावर त्यात पास्ता सॉस घाला आणि गॅॅस बंद करा. हा तयार चटकदार पास्ता प्लेटमध्ये काढून त्यावर कोथिंबीर घाला. 

         अशा प्रकारे यम्मी चटपटीत पास्ता तयार होईल. 

No comments:

Post a Comment