Monday, April 24, 2023

घरगुती पद्धतीने चमचमीत व झटपट ओल्या काजूची भाजी


          मराठ्मोळी महाराष्ट्रीयन खास करून कोकणात केली जाणारी 'ओल्या काजूची भाजी'. 


'ओल्या काजूची भाजी' बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- 

  • पाव किलो सोललेले ओले काजूगर 
  • २ कांदे 
  • २ बटाटे 
  • १ टोमॅॅटो 
  • अर्धा ओला नारळ किसून 
  • लसूण 
  • आले
  • गरम मसाला पावडर 
  • तिखट 
  • हळद 
  • मीठ 
  • कोथिंबीर 
  • तेल. 
'
ओल्या काजूची भाजी' बनवण्याची कृती :- 

  • काजूगर रात्री कोमट पाण्यात भिजत घालून सकाळी सोलावेत.
  • बटाट्याची साले काढून तुकडे करावेत. 
  • प्रथम कढईत तेल टाकून जिरे, मोहरी, कांदा, लसूण व टोमॅॅटो टाकून चांगले परतवून घेणे. 
  • चांगले शिजल्यावर त्यात सोललेले काजू व बटाट्याचे तुकडे टाकून त्यात आवडीनुसार तिखट, हळद, मीठ व पाणी घालून शिजू द्यावी. 
  • नंतर भाजलेला कांदा - खोबऱ्यात वाटप करून ते त्यामध्ये घालावे व पुन्हा चांगले शिजवून घ्यावेत. 
  • चांगल्या उकळ्या आणून काजू व बटाटा शिजवून घ्यावेत. 
  • काजू व बटाटा शिजला की त्यामध्ये गरम मसाला पावडर घालावी व एक उकळी आणून गॅॅस बंद करावा. 
  • तयार भाजीवरती बारीक चिरलेली कोथिंबीर पसरावी. 
        अशा पद्धतीने झटपट आणि स्वादिष्ट अशी ओल्या काजूची भाजी तयार झाली आहे. एकदा करून व खाऊन बघाच. 

No comments:

Post a Comment