Friday, April 21, 2023

कुरकुरीत व सोप्या पद्धतीचा मेदू वडा !


                                                       कुरकुरीत मेदू वडा 

मेदू वडासाठी लागणारे साहित्य :- १) ३ वाट्या उडदाची डाळ, २) १ चमचा मीठ, ३) ओल्या मिरच्या, ४) अर्धा इंच आले. 

मेदू वडा करण्याची कृती :- 

- रात्री डाळ भिजत घालावी. सकाळी डाळीतील पाणी निथरून डाळ जाडसर वाटावी. 

- त्यात मीठ व आले बारीक चिरून घालावे. 

- नंतर चांगले एकत्र करून प्लास्टिकला तेलाचा हात लावून लिंबाएवढा वड्याचा गोळा बनवून घेऊन जाडसर थापावे व मध्ये भोक पाडावे. 

- कढईत तेल चांगले कडकडीत तापल्यावर एकेक वडा सोडावा म्हणजे वडा फुगून वर येईल. 

- वडा दोन्ही बाजूंनी लाल झाल्यावर बाहेर काढावा. 

मेदू वडयाचे सांबार करण्याचे साहित्य :-  १) २ वाट्या तुरीची डाळ, २) ४ वांगी, ३) २ टोमॅॅटो, ४) २ मोठे कांदे, ५) कोथिंबीर, ६) लिंबाएवढी चिंच, ७) मोठ्या लिंबाएवढे गुळ. 


मेदू वडा सांबरा कृती :- 

- १ चमचा तेल सर्व मसाले मंद गॅॅसवर गुलाबी रंगावर भाजावेत. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये कोरडे वाटावेत. 

- कांदा उभा चिरून घ्यावा. वांगी व टोमॅॅटो मध्यम चिरावेत. 

- कुकर मध्ये डाळ व सर्व भाज्या वेगवेगळे शिजवून घ्यावेत. 

- पातेलीत अर्धा चमचा तेल घालावे. तेल तापल्यावर अर्धा चमचा मोहरी, १/४ चमचे जिरे, १/४ चमचे हिंग व १०-१२ कढीपत्त्याची फोडणी द्यावी. त्यात शिजलेली डाळ घालावी व ४-५ वाट्या पाणी घालून बेताची पातळ करावी. 

- त्यानंतर त्यात शिजलेल्या भाज्या, कांदा, २ चमचे तिखट, थोडी हळद, लिंबाएवढी चिंच, मोठ्या लिंबाएवढा गुळ, वाटलेला सांबारा मसाला व कोथिंबीर घालावी. 

- सांबार चांगले उकळून गॅॅस बंद करावा. 

                          याचबरोबर आपला कुरकुरीत मेदू वडा खाण्यासाठी तयार झालेला आहे.

 

No comments:

Post a Comment