चमचमीत पनीर मसाला
पनीर मसाला करण्यासाठी साहित्य :-
- बटर
- जिरे
- बारीक चिरलेला १ कांदा
- १ कांदा किसून घ्यायचा
- लाल तिखट
- गरम मसाला धने-जिरे एकेक चमचे
- अर्धा चमचा बडीशेप
- २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
- १ चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट
- २०० ग्रॅॅम पनीर
- अर्धा कप दुध.
पनीर मसाला करण्याची कृती :- कढईमध्ये बटर गरम करून त्यात जिरे टाकून फोडणी करून घ्या. फोडणी झाल्यानंतर चिरलेला कांदा टाकून परतून घ्या. त्यानंतर त्यात हिरव्या मिरच्यांचे काप टाका. मिरच्या परतल्यानंतर त्यात किसलेला कांदा टाका आणि तो ही त्याचा कच्चा वास जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्या. त्यात आता लसूण आणि आल्याची पेस्ट टाकून परता. आता त्यात लाल तिखट, गरम मसाला, धणे-जिरे पूड टाका. कढईवर झाकण ठेवून सगळ्या मिश्रणाला चांगली वाफ येऊ द्या. आणि त्यानंतर गॅॅस बंद करा. हे मिश्रण थोडे थंड झालं की ते मिक्सरमधून वाटून त्याची ग्रेव्ही करा. ही ग्रेव्ही पुन्हा कढईत टाका. त्यात अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दुध टाकून उकळी येऊ द्या. आता त्यात मीठ टाका. आवडत असल्यास किचन किंग मसालाही टाकू शकता. सगळ्यात शेवटी या ग्रेव्हीमध्ये शॅॅलो फ्राय केलेले पनीरचे तुकडे टाका. ३ ते ४ मिनिटे कढईवर झाकण ठेवून वाफ येऊ द्या.
अशा प्रकारे आपला गरमागरम पनीर मसाला तयार झाला आहे.

No comments:
Post a Comment