Friday, April 21, 2023

घरच्या घरी स्वादिष्ट अशी व सोप्प्या पद्धतीने बनवा पाणी पुरी


पुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- 

  • १ वाटी रवा 
  • ३ चमचे मैदा 
  • १/४ चमचा बेकिंग सोडा 
  • मीठ (चवीनुसार) 
  • तेल (तळण्यासाठी) 
पाणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- 

  • अर्धी वाटी चिंच कोळ.
  • २ वाटी पाणी.
  • ३ हिरवी मिरची 
  • २ चमचे भाजलेले जिरे किंवा जिरा पावडर. 
  • २ चमचे गुळ. 
  • १/२ वाटी पुदिन्याची पान. 
  • १ चमचा बुंदी. 
  • १/२ मोठा चमचा लिंबू रस.
  • मीठ (चवीनुसार). 
पुरीमध्ये भरण्यासाठी लागणारे साहित्य :- 

  • हिरवी चटणी 
  • लाल चिंचेची चटणी 
  • २ उकडलेले बटाटे
  • १/२ वाटी उकडलेले छोटे चणे किंवा मुग (आवडीनुसार) 
  • मीठ (चवीनुसार) 
  • कांदा (बारीक चिरलेला) 
          

 

         
पाणी पुरी बनवण्याची कृती
:-  

 कृती १: पाणी बनवण्यासाठी केली जाणारी कृती :- 

    • सर्व प्रथम ब्लेंडरमध्ये कोथिंबीर, पुदिन्याची पाने आणि हिरव्या मिरच्या आणि २ चमचा जिरे घालून त्याची बारीक पेस्ट बनवा. 
    • आता एका भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये हिरवी पेस्ट, चिंच कोळ, बुंदी, गुळ, लिंबू रस आणि मीठ (चवीनुसार) घालून ते चांगले एकत्र करून घ्या आणि गुळ विरघळूपर्यंत ढवळत रहा.
    • मग ते चांगले एकत्र केल्यानंतर ते चांगले गाळून घ्या आणि ते २ ते ३ तास फ्रीजमध्ये ठेवा. 
कृती २ : पुऱ्या बनवण्यासाठी केली जाणारी कृती :- 

    • सर्व प्रथम एक मोठा बाऊल घ्या आणि त्यामध्ये मैदा, रवा, सोडा आणि मीठ (चवीनुसार) घाला आणि ते चांगले एकत्र करा आणि त्यानंतर त्यामध्ये लागेल तसे पाणी घालून ते चांगले घट्ट मळून घ्या. 
    • मग त्यावर झाकण घालून ते पीठ २५ ते ३० मिनिटे चांगले भिजू द्या. 
    • २५ ते ३० मिनिटाने ते पीठ परत चांगले मळून घ्या आणि त्याचे चपाती बनवण्यासाठी जेवढे आपण गोळे बनवतो त्या आकाराचे गोळे बनवा आणि ते कोरडा मैदा वापरून चपातीच्या आकारा एवढी लाटून घ्या. 
    • आणि मग पाणी पुरीच्या आकाराच्या पुऱ्या छोट्या वाटीने किंवा टोपनाणे पाडून घ्या. 
    • आता गॅॅसवर कढई ठेवून त्यामध्ये पुऱ्या तळण्यासाठी तेल गरम करा आणि एकदा तेल गरम झाले की त्यामध्ये पुऱ्या लालसर रंगावर टाळून घ्या. 
कृती ३ :- पाणी पुरीचे सर्व्हिंग कसे करावे. 

    • सर्वप्रथम एका बाऊलमध्ये बटाटे मॅॅश करा आणि त्यामध्ये मीठ घालून ते चांगले मिक्स करा आणि बाजूला ठेवा. 
    • मग आपण तयार केलेल्या पुऱ्या घ्या आणि त्यांना एका बाजूने हलक्या हाताने छिद्र पाडा आणि मग त्यामध्ये कुसकरलेलाबटाटा, कांदा आणि उकडलेले चणे घाला मग त्यामध्ये हिरवी चटणी, चिंच चटणी आणि पाणी पुरीचे पाणी घाला आणि ते सर्व्ह करा. 
                          अशा पद्धतीने स्वादिष्ट अशी पाणी पुरी तयार झाली आहे. 







No comments:

Post a Comment