Friday, April 21, 2023

झटपट रवा डोसा


साहित्य :

  • १ वाटी रवा 
  • २ वाटी ताक 
  • १/२ तांदळाचे पीठ
  • १ चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची 
  • १/२ चमचा सोडा
  • १/२ छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • मीठ (चवीनुसार)
  • पाणी (आवश्यकतेनुसार)
     

रवा डोसा बनवण्यासाठी केली जाणारी कृती : 

  • सर्वप्रथम एक मिक्सिंग बाऊल घ्या त्यामध्ये रवा आणि तक घाला आणि ते चांगले एकत्र करून त्यावर झाकण घालून ते १० ते १५ मिनिटे भिजत घाला. 
  • १० ते १५ मिनिटांनी ते भिजले की त्यामध्ये तांदळाचे पीठ घाला आणि त्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी घालून ते चांगले एकत्र करून घ्या. 
  • आता या बॅॅटरमध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सोडा घालून ते बॅॅटर चांगले फुगेल आणि त्यामुळे आपला डोसा मऊ बनण्यासाठी मदत होईल. 
  • आता गॅॅसवर डोसा तवा ठेवून तो मध्यम आचेवर गरम करून घ्या आणि मग त्या तव्याला तेल लावून त्यावर वाटीने डोस्याचे बॅॅटर पसरवा आणि मध्यम आकाराचा गोल डोसा बनवा 
  • आणि त्याच्याबाजूने तेल सोडून तो डोसा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्या आणि भाजल्यानंतर तो तव्यातून काढा आणि दुसरा डोसा बनवा. (डोसा दोन्ही बाजूने चांगला भाजून घ्या.)
  • अशा प्रकारे सर्व बॅॅटरचे अशे डोसे बनवून घ्या. 
         अशा प्रकारे गरमागरम डोसा तयार होईल. खोबऱ्याची चटणी, सांबर किंवा बटाट्याच्या भाजी सोबत सर्व्ह करू शकता. 

No comments:

Post a Comment