साहित्य :
- २ किलो उडदाच्या डाळीचे पीठ
- १०० ग्रॅॅम पापडखार
- १ | | बारीक मीठ
- १५ ग्रॅॅम पांढरे मिरे
- २५ ग्रॅॅम काळे मिरे
- हिरव्या मिरच्या आवडीनुसार
- १ | | वाटी तेल, ५० ग्रॅॅम हिंग
कृती :
- उडदाची डाळ दळून आणावी, २ वाट्या पीठ बाजूला काढून ठेवावे, ४ वाट्या पाणी पातेल्यात घ्यावे त्यात पापडखार व मीठ घालून उकळावे.
- पाणी गार झाल्यावर थोडा पापडखार खाली बसेल तो घेऊ नये वरील पाणी घ्यावे. हिरव्या मिरच्यांवर उकळते पाणी घालून त्या उन्हात वाळवून त्यांचे पांढरे तिखट तयार करावे. मिरच्यांची व हिंगाची पूड करावी.
- उडदाच्या डाळीच्या पिठात मिरपूड, हिंगपूड, तिखट घालून पापडखार व मिठाच्या उकळून गार केलेल्या पाण्याने पीठ घट्ट भिजवावे.
- पीठ शक्यतो रात्री भिजवून ठेवावे. दुसऱ्या दिवशी पाट्याला तेलाचा हात लावून कुटावे. पीठ कुटुन त्याचा मऊ गोळा झाला पाहिजे.
- पीठ कूटताना अधून मधून पिठाचा गोळा हाताने ताणून लांब करून परत गोळा करून कुटावा. पिठाचा गोळा मऊ झाला की, तेलाच्या हाताने सारख्या आकाराच्या लाट्या करून झाकून ठेवाव्यात व एक एक लाटी उडदाच्या डाळीच्या पिठावर पातळ लाटावी व पापड तयार करावेत.
- तयार झालेले पापड सावलीत वाळवून डब्यात भरावेत. सर्व पापड झाल्यावर दोन दिवस सावलीत खडखडीत वाळवावेत.
- टीप - वरील पापडाच्या पिठात १ किलो मूगाची डाळ समप्रमाणात घेऊन केलेले उडीद-मुगाचे पापडही चांगले होतात, पापड भाजून खायचे असतील तर खूप पातळ लाटू नयेत.

No comments:
Post a Comment