Thursday, April 27, 2023

खमंग कुरकुरीत शेव


 

आपण आज खमंग कुरकुरीत शेव कसे बनवायचे ते पाहणार आहोत. 

साहित्य :- 

  • चार वाट्या बेसन ( चाळून घेतलेलं गुठळ्या नकोत ) 
  • तांदुळाचे पीठ अर्धी वाटी 
  • दोन टीस्पून ओवा वाटून, तो अर्धी वाटी पाण्यात मिक्स करून ते पाणी गाळून घेणे, ह्या बरोबर तुम्ही थोडी लसूण ही वाटू शकता. 
  • हिंग अर्धा चमचा
  • मीठ चवीनुसार 
  • पाव चहाचा चमचा हळद आणि तेल.
     
कृती :- 

  • परातीत बेसन, तांदुळाचे पीठ, मीठ, हिंग, हळद हे सगळे एकत्र करून घ्यावे. त्यात चार चहाचे चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे. 
  • ते मोहन सगळ्या पिठाला चांगले चोळून घ्यावे.
  • ओवा गाळून घेतलेलं पाणी त्यात घालावे. नंतर गरजेप्रमाणे पाणी घालून मीठ भिजवावे.
  • पीठ घट्ट नको, थोडं सैलसरच असावे.
     
  • हे पीठ दहा मिनिटे ठेवून द्यावे. 
  • चकलीच्या साच्यात शेवेची बारीक जाळी घालून पीठ त्यात भरावे आणि गरम तेलात शेव पाडून शेव तळून घ्यावी. 
  • तयार आहे कुरकुरीत खमंग शेव. तुम्ही घरी ट्राय करून बघा.  

No comments:

Post a Comment