साहित्य :
- ४ वाटी दूध
- २ मोठे चमचे शेवया
- दीड मोठा चमचा साखर
- ३ ते ४ चमचे तूप
- २ ते ३ चमचे गव्हाचे पीठ
- १/२ चमचा वेलची पावडर
- २ ते ३ चमचे काजू, पिस्ता, बदाम तुकडे
कृती :
- शेवयाची खीर बनवताना सर्व प्रथम गॅॅसवर मध्यम आचेवर एक भांडे ठेवा आणि त्यामध्ये एक चमचा तूप घाला आणि तूप वितळले की त्यामध्ये काजू,बदाम आणि पिस्ता तुकडे घाला आणि ते तुपामध्ये ३ ते ४ मिनिटे चांगले भाजून घ्या.
- आणि ते भाजल्यानंतर बाजूला काढून ठेवा.
- आता त्यामध्ये ३ चमचे तूप घाला तूप गरम झाले की त्यामध्ये शेवया घाला आणि शेवया मंद आचेवर गुलाबीसर रंग येईपर्यंत भाजा त्या चांगल्या भाजल्या की त्यामध्ये थोडे गव्हाचे पीठ घाला
- आणि ते देखील २ मिनिटे भाजा आणि शेवया बाजूला काढा.
- आता तेच भांडे मध्यम आचेवर गॅॅसवर ठेवा आणि त्यामध्ये दूध घाला आणि दूध थोडे गरम होऊ द्या मग त्यामध्ये गव्हाच्या पीठासोबत तुपामध्ये भाजलेल्या शेवया, साखर, वेलची पावडर आणि तुपामध्ये परतून घेतलेले ड्राय फ्रुट्स घाला आणि ते चांगले मिक्स करून खीर ६ ते ७ मिनिटे चांगली शिजू द्या.
- ६ ते ७ मिनिटे खीर मध्यम आचेवर चांगली शिजली की गॅॅस बंद करा.
No comments:
Post a Comment