Wednesday, April 26, 2023

पौष्टिक डिंकाचे लाडू


 

आज आपण पाहणार आहोत पौष्टिक डिंकाचे लाडू कसे बनवता येतील. चला तर मग बघूया याची साहित्य आणि कृती.

साहित्य :- 

  • पाव किलो डिंक 
  • अर्धा किलो सुके खोबरे 
  • अर्धा किलो खारीक 
  • एक वाटी खसखस 
  • पाव वाटी बदाम 
  • एक किलो गुळ किंवा साखर 
  • बिब्याच्या बिया 
  • अर्धी वाटी साजूक तूप.
कृती :- 

  • साधारणपणे हरभऱ्याच्या डाळीएवढा बारीक होईल, इतपत डिंक जाडसर कुटावा. 
  • नंतर डिंकाला तुपाचा हात लावून तो उन्हात ठेवावा. 
  • खोबरे किसून, भाजून घ्यावे. खारकांची पूड करून घ्यावी. 
  • खसखस भाजून घ्यावी. बदाम सोलून त्यांचे जाड काप करून घ्यावेत. 
  • बिब्याच्या तुपामध्ये तळून त्यांच्या लाह्या करून घ्यावेत. थोडे तूप टाकून खारकांची पूड भाजून घ्यावी.
  • नंतर साखरेचा किंवा गुळाचा पक्का पाक करून, त्यात अर्धी वाटी तूप घालावे. 
  • नंतर त्यात डिंक व तयार करून घेतलेले वरील सर्व साहित्य घालावे. 
  • चांगले मिसळून घेऊन लाडू वळावेत. हे लाडू गरमच वळावे लागतात. 
  • हे लाडू उपवासालाही चालतात. 

No comments:

Post a Comment