Sunday, April 23, 2023

चविष्ट मटण राईस

 

साहित्य :- 

  • ४ वाटी भिजलेले तांदूळ 
  • अर्धा किलो मटण 
  • २ वाट्या कोथिंबीर 
  • ४ ते ५ हिरव्या मिरच्या 
  • ५ ते ६ काळीमिरी 
  • २ वेलची 
  • तमालपत्र 
  • अर्धा चमचा शहाजिरे 
  • अर्धा कप दही 
  • १ लिंबाचा रस 
  • २ चमचे पुदिना 
  • ४ मोठे चमचे तेल 
  • २ मोठे कांदे उभे चिरलेले 
  • अर्धा चमचा हळद 
  • १ चमचा आलं-लसूण पेस्ट 
  • २ उकडलेली अंडी 
  • मीठ चवीनुसार 
 कृती:- 

  • मटणामध्ये मीठ व हळद टाकून कुकरमध्ये ४ शिट्या करून घ्यावे. 
  • एका मोठ्या पातेल्यामध्ये तेल टाकून त्यात शहाजिरे, वेलची, दालचिनी, काळीमिरी टाकावी. 
  • खडा मसाला भरून झाल्यानंतर त्यात कांदे लालसर परतून घ्यावे. 
  • मिक्सरमध्ये आलं-लसूण पेस्ट,कोथिंबीर,हिरव्या मिरच्या वाटून ते मिश्रण त्या पातेल्यात टाकणे. 
  • दोन ते तीन मिनिटे हे मिश्रण परतल्यानंतर त्यात तांदळाच्या दुप्पट पाणी टाकणे. 
  • हे मिश्रण उकळल्यानंतर त्यात केवळ भिजलेले तांदूळ, फेटलेले दही, बारीक चिरलेला पुदिना, लिंबाचा रस टाकून भात शिजून ठेवणे. 
  • भात अर्धा शिजल्यानंतर त्यात शिजलेले मटण टाकणे. 
  • भात शिजत आल्यानंतर गॅसवर तवा गरम करणे व मंद आचेवर झाकण लावून भात मुरायला ठेवणे. 
  • दहा मिनिटानंतर गॅस बंद करणे. 
  • उकडलेल्या अंड्याने भात गार्निश करणे.    

No comments:

Post a Comment