गोड खाणंं कोणाला आवडत नाही आणि जर गोष्ट शिऱ्याची असेल तर की सांगायचे. रव्यापासून ते गाजर आणि मुगाचा शिरा तर सर्वानीच खालेला असणार पण आपण कधी खजुराचा शिरा खाल्लेला आहे का ? हिवाळ्यात हे खाल्याने शरीरास उष्णता मिळते. चला तर मग करू या खजुराचा शिरा.
साहित्य :-
- २०० ग्रॅम खजूर
- १ कप दुध
- दीड कप पिठी साखर
- १/४ कप साजूक तूप
- १०० ग्रॅम काजू
- १ लहान चमचा वेलची पूड.
- सर्वप्रथम एका भांड्यात दूध गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये खजूर देखील घाला.
- उकळी येवू द्या. दूध घट्ट झाल्यावर गॅस कमी करा.
- एका वेगळ्या पॅनमध्ये थोडंस तूप गरम करा. त्यामध्ये काजू परतून घ्या.
- खजुराचे मिश्रण घट्ट झाल्यावर यामध्ये पिठी साखर, तूप, आणि काजू घाला.
- मिश्रणाने पॅनचे कडे सोडल्यावर त्यामध्ये वेलचीपूड घाला.
- एका भांड्यावर तूप लावा. त्यात मिश्रण टाकून सेट होण्यासाठी ठेवा.
- मिश्रण थंड झाल्यावर समजावं की शिरा तयार झाला आहे.
- शिरा खाण्यासाठी सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment