आपण आज साबुदाणा इडली कशी बनवायची ते जाणून घेऊया.
साहित्य :-
- २०० ग्रॅम साबुदाणा
- २५० ग्रॅम वरीचे तांदूळ
- २०० ग्रॅम दही
- चवीनुसार मीठ
- बेकिंग सोडा
- तूप
- जिरे
- पाणी
- साबुदाणा आणि वरीचे तांदूळ वेगवेगळे मिक्सरमधून वाटून घ्या.
- नंतर ते मिश्रण एकत्र करा. आणि त्यात दही, मीठ, जिर घालून पाण्याने भिजवून साधारण एक ते दोन तास भिजवून ठेवा.
- पीठ भिजल्यावर त्यात अगदी पाव चमचा बेकिंग सोडा घाला. त्यानंतर इडली पात्राला तूप लावा आणि त्यावर हे मिश्रण घाला.
- इडली वाफवून घ्या. खोबऱ्याच्या चटणीसह सर्व्ह करा.
- आपण यात आपल्या आवडीप्रमाणे गाजर, कोथिंबीर, मिरची आणि भाजलेल्या दाण्याचा कूट देखील घालू शकता.
No comments:
Post a Comment